
११ पैकी ११ जागांवर विजयी होत प्रचंड बहुमताने मारली बाजी…
अमळनेर:- तालुक्यातील फाफोरे येथील वि.का.सो.च्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनलने सर्वच्या सर्व ११ पैकी ११जागांवर प्रचंड बहुमताने विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

यात सर्वसाधारण मतदार संघात प्रताप पाटील, जितेंद्र पाटील, शरद पाटील, प्रदीप पाटील, प्रवीण पाटील (राजू दादा फापोरेकर), पंकज पाटील, खंडेराव पाटील,मुरलीधर पाटील, महिला राखीव मतदार संघात सुंदरबाई यादवराव पाटील, भिकुबाई संभाजी पाटील तसेच इतर मागासवर्गीय मतदार संघातून भालेराव भिका पाटील हे विजयी झाले. सर्वच उमेदवारांनी एकूण झाल्या ३५७ मतापैकी २०० पेक्षा अधिक मते घेत विजय संपादित केला. सहकार पॅनलच्या वतीने प्रचाराची धुरा बाळासाहेब पाटील,प्रवीण बाबा, बाबुराव पाटील, जे.एस.पाटिल सर शालिग्राम पाटील, सुनील पाटील, सतीश पाटील, शशिकांत पाटील, विशाल पाटील,मयूर पाटील, उपसरपंच दिनेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, किशोर पाटील,राहुल पाटील,सागर पाटील तसेच सर्व तरुण वर्गाने सांभाळली. फाफोरे ग्रामस्थांनी दाखवलेला विश्वास व केलेले सहकार्य याबद्दल सदैव ऋणी, राहू तसेच शेतकरी हिताच्या दृष्टीने अनेक नवनवीन उपक्रम हाती घेऊन सोसायटी सक्षम करू, असे सांगत विजयी उमेदवारांनी सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले.







