
अमळनेर : बंद घराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानी पिंपळे रस्त्यावरील समर्थ नगर मधील श्रीरंग कॉलनीत एकाचे घर फोडून सव्वा लाखाची रोख रक्कम व किरकोळ दागिने चोरून नेल्याची घटना १२ रोजी सकाळी उघडकीस आली.

प्रकाश सुकलाल विसपुते रा श्रीरंग कॉलनी हे कुटुंबीय बाहेरगावी गेलेले असताना अज्ञात चोरट्यानी घराचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटाचे साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले. पोलिसांना घटना कळवताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज , मिलिंद सोनार ,गणेश पाटील यांना पंचनामा करण्यासाठी पाठवले. घरातील ५ ग्राम सोन्याच्या कानातले , १०० ग्राम चांदीचा गणपती , तसेच एक लाख २५ हजार रुपये रोख चोरीला गेल्याचे सांगण्यात आले.




