
अमळनेर:- तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे खु येथे लोकसहभागातून एक ते दीड किलोमीटर रस्ता करण्यात आला.

ग्रुप ग्रामपंचायत चिमनपुरी पिंपळे खु येथे लोकसहभागाच्या उत्तम शेतातील परिसरात जाणारा महत्त्वाचा रस्ता तयार करण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत असलेल्या या रस्त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे व शेतकऱ्या ंनी निर्णय घेण्यात आला आणि गावकऱ्यांनी स्वेच्छेने पुढे येत आर्थिक योगदान, श्रमदान व यंत्रसामग्रीची मदत देत रस्ता बांधकामात सक्रिय सहभाग नोंदविला.
ग्रुप ग्रामपंचायत प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ वर्ष युवराज पाटील व सदस्य संतोष बापू चौधरी, माझी उपसरपंच गोकुळ पाटील साहेबराव आनंदा पाटील सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील स्थानिक शेतकऱ्यांनी लोक वर्गणी करून केवळ काही दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण झाले. या उपक्रमामुळे शेतातील वाहतूक सुकर झाली असून शेतकऱ्यांना शेतमाल शेतमाल व शेत तयार करण्यासाठी ट्रॅक्टर व शेणखत ट्रॅक्टरने वाहतूक करण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
या यशस्वी उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून पुढील काळातही अशा विकासकामांसाठी एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन ग्रुप ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे




