
शहरातील प्रताप मिल कंपाऊंड मधील घटना…
अमळनेर:- शहरातील प्रताप मिल कंपाऊंड परिसरातले बंद घर फोडून सुमारे ३.४३ लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना १२ रोजी उघडकीस आली आहे.

फिर्यादी रुपाली राजेद्र शिरसाठ ( प्रताप मिल कंपाऊन्ड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिंनाक १० एप्रिल रोजी दुपारी 04.00 वाजेच्या सुमारास फिर्यादी, तिची मुलगी संगमित्रा व तिचे दोन्ही मुले असे शेगांव येथे गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी घराला कुलुप लावुन निघुन गेले. दिनांक १२ एप्रिल रोजी सकाळी 09.45 वाजेच्या सुमारास शेगांव येथे असतांना घराच्या समोर राहणाऱ्या महिलेने फोन करुन कळविले की, तुमच्या घराचा पुढील लाकडी दरवाजा उघडा असुन, घरात कुत्रे घुसत आहेत. त्यावर त्यांनी घराच्या दरवाज्या जवळ जावुन पाहिले असता, घरात चोरी झाल्याचे त्यांनी सांगितल्याने, फिर्यादी महिला 03.00 वाजेच्या सुमारास परत आली. तिने घरात जावुन पाहिले असता, घरात सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. त्यानंतर बेडरुममध्ये ठेवलेल्या कपाटाजवळ जावुन पाहीले असता, कपाटातील कपडे व बेन्टेक्सच्या वस्तु व इतर वस्तु खाली पडलेले दिसले. कपाटाच्या तिजोरीमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिणे व रोख रुपये हे दिसुन आले नाहीत. त्यावरून त्यांची खात्री झाली कि, कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराचा लावलेले कुलुप तोडुन चोरी केली आहे. यात 52,500/- रुपये किमतीची 25 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 10,500/- रुपये किमतीची 05 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 10,500/- रुपये किमतीची 5 ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे टोंगल, 14,700/- रुपये किमतीची 7 ग्रॅम वजनाची सोन्याची मनी मंगळसुत्र, 21,000/- रुपये किमतीची 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, 4200/- रुपये किमतीची 2 ग्रॅम वजनाचे सोन्याचा तुकडा, 2100/- रुपये किमतीचे 1 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी, 23100/- रु. किमतीची 11 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, 8,400/- रु. किमतीची 04 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 1,24,284/-रुपये किमतीची 13 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 22,680/- रुपये किमतीची 2.32 ग्रॅम वजनाची सोन्याचे मंगळसुत्र, 50,000/- रुपये रोख असे एकुण 3,43,964/- रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि समाधान गायकवाड हे करीत आहेत.




