
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव झाला थाटात
अमळनेर:-शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी हजारोंनी उपस्थिती दिली.काल 14 एप्रिल रोजी आंबेडकर चौकासह विविध ठिकाणी थाटात कार्यक्रम पार पडले.

काल सकाळी 8 वाजता डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळ सर्व लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी एकत्रित आल्यानंतर बौद्धचार्य सिद्धार्थ सोनवणे यांनी सुरवातीला पंचशील,त्रिशरण सादर केली त्यानंतर बुद्ध वंदना होऊन माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास माल्यार्पण व संविधान पूजन करण्यात आले.यावेळी अभिवादन करण्यासाठी माजी आमदार डॉ.बी एस पाटील,माजी आमदार शिरीष चौधरी,नगराध्यक्ष डॉ.परीक्षित बाविस्कर,प्रांताधिकारी मयूर भंगाळे,तहसीलदार सुराणा,न प चे मुख्याधिकारी गणेश शिंदे,पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम,होमगार्ड समादेशक अरुण नेरकर,सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ठाकुर,माजी नगरसेवक नरेंद्र संदानशीव,संदीप घोरपडे,लालचंद सैनानी,चेतन राजपूत, ऍड. एस एस ब्रह्मे,नगरसेवक महेश देशमुख,श्रीराम चौधरी,कैलास नामदेव पाटील,नावेद शेख,विक्रांत पाटील,मुन्ना शर्मा,अर्बन बँक संचालक प्रवीण जैन,नितीन निळे,प्रा विजय खैरनार, मुक्तार खाटीक,भरतसिंग परदेशी,चेतन राजपूत,
दत्ता संदानशीव,सोमचंद संदानशीव,चैतन्य संदानशीव,तुषार संदानशीव,गुणवंत पाटील आदी उपस्थित होते.यानंतर जयंती उत्सव निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे आमदार अनिल पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दिवसभर रीघ लागली होती.दरम्यान यावेळी युवा कल्याण प्रतिष्ठान तर्फ़े संविधान जागर अभियान निमित्त चवदार तळ्याबाबत लघुनाट्य प्रा अशोक पवार,अशोक बिऱ्हाडे व त्यांच्या ग्रुपने सादर केले.
भव्य मोटरसायकल धम्म रॅलीने वेधले लक्ष
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद,सिद्धार्थ व्यायामशाळा व डॉ.आंबेडकर अध्ययन केंद्र,अमळनेर तर्फे माजी नगरसेवक नरेंद्र संदानशीव यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 10 वाजता डॉ.आंबेडकर चौकातून भव्य मोटरसायकल धम्म रॅली काढण्यात आली.या रॅलीने संपुर्ण शहराचे लक्ष वेधले होते.
सायंकाळी आंबेडकर चौकात झाला जल्लोष
जयंतीनिमित्त डॉ आंबेडकर चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ सुंदर सजावट व सुशोभीकरण करण्यात आले होते.सायंकाळी विद्युत रोषणाईने हा परिसर अत्यंत खुलून दिसत होता.यावेळी बाहेर गावाहून आणलेल्या अत्याधुनिक डिजेने कार्यक्रमात खूपच रंगत आणली भीमगीतांवर तरुणाई पासून, महिला व अबाल वृद्ध सारेच याठिकाणी थिरकले होते.रात्री उशिरापर्यंत हा जल्लोष सुरू होता.शहरात इतर भागातही जयंती उत्सवाची तयारी करण्यात आली असल्याने प्रबुद्ध कॉलनी,बंगाली फाईल,ताडेपुरा,फरशी पूल आदी भागातून भव्य मिरवणूका निघुन त्या देखील आंबेडकर चौकात दाखल झाल्याने याठिकाणी अतिशय बाबासाहेबांच्या नावाने अतिशय मोठा जल्लोष साजरा झाला.यासह इतर भागात विविध कार्यक्रम पार पडले.




