
अमळनेर -सालाबादाप्रमाणे यंदाही विठ्ठल रुक्मिणी संस्थान अमळनेर पंढरपूरच्या वतीने श्री संत सखाराम महाराज यांचा वार्षिक यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे, या उत्सवाची जय्यत तयारी संस्थान तर्फे करण्यात आली आहे.

आज दि 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेनिमित्त संस्थांनचे गादीपुरुष परमपूज्य संत श्री प्रसाद महाराज यांचे उपस्थितीत स्तंभारोपण व ध्वजारोहन होऊन यात्रोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. नदीपात्रात लोक प्रतिनिधी, शासकीय अधिकारी व भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. 26 एप्रिल रोजी मोहन महाराज बेलापूरकर महाराज यांच्या दिंडीचे आगमन होऊन दि 27 एप्रिल रोजी वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीला सायंकाळी रथोत्सव तर दि 1 मे रोजी वैशाख शुद्ध पौर्णिमेला सकाळी ६ पासून पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.दरम्यानच्या काळात अनेक विशेष कार्यक्रम पार पडणार असून सोबत नदी पात्रात मोठ्या प्रमाणात थाटनाऱ्या यात्रोत्सवाचा सर्वांना आनंद घेता येणार आहे.




