
खान्देश साहित्य संघ आयोजित पहिला आखाजी महोत्सव प्रचंड गर्दीने झाला यशस्वी..
अमळनेर : खान्देशातील आखाजी महोत्सव हा अहिराणी संस्कृतीतील महत्वाचा सण असून गौराई, झोक्यावरची गाणी , जात्यावरील गाणी या रूढी परंपरा जतन करून त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. पहिला आखाजी महोत्सव प्रचंड गर्दीने यशस्वी झाला आहे त्यामुळे हा कार्यक्रम शासकीय आणि मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा आणि यासाठी शासकीय निधी मिळवून देण्यासाठी सांस्कृतिक मंत्री आणि शासनाकडे प्रयत्न करेल असे प्रतिपादन भाजप चे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी केले.

खान्देश साहित्य संघ तर्फे अमळनेर येथील एल आय सी कॉलनीत आखाजी महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रा डॉ सदाशिव सूर्यवंशी होते. राजेश पांडे पुढे म्हणाले की मला अमळनेर सोडून ३८ वर्षे झाली मात्र अहिराणीची गोडी कमी झाली नाही म्हणून अहिराणीतून बोलत आहे. महिलानी या आधुनिक जगातही ही परंपरा टिकवून ठेवावी. यावेळी प्रा डॉ योगिता पाटील यांनी अहिराणी भाषेतून आखाजीचे महत्व विषद केले.
यावेळी आमदार अनिल पाटील यांनी सांगितले की महिलांनी अजूनही रूढी ,परंपरा जतन करून ठेवल्या ही अभिमानास्पद बाब आहे. माजी आमदार साहेबराव पाटील यांनीही अहिराणीत फटकेबाजी केली. प्रास्ताविक संघाचे जिल्हाध्यक्ष शरद धनगर यांनी तर स्वागतपर भाषण स्वागताध्यक्ष कृउबा सभापती अशोक आधार पाटील यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य संघाचे सचिव रमेश बोरसे , खजिनदार प्राचार्या रत्नाताई पाटील , जेष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील , कवी हिरामण कंखरे , अहिराणी साहित्यिक गोकुळ बागुल , शाहीर नाना पाटील , भाऊसाहेब देशमुख, जयवंतराव पाटील , डॉ अनिल शिंदें , दिनेश नाईक ,एल टी पाटील हजर होते.
सभापती अशोक पाटील , लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर , उपनगराध्यक्ष प्रशांत निकम , ऍड व्ही आर पाटील , माजी नगरसेवक विक्रांत पाटील , म. वा. मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी, मंगळग्रह संस्थेचे अध्यक्ष डॉ डिगंबर महाले , बाजार समिती संचालक सचिन पाटील , अमेय मुंदडा , रिता बाविस्कर , राजू फपोरेकर ,नगरसेवक सचिन पाटील , ज्ञानेश्वर धनगर , जयेशकुमार काटे यांनी बक्षीस व कार्यक्रमासाठी योगदान दिले. यावेळी पारंपरिक रूढी परंपरा प्रमाणे स्पर्धा घेण्यात आल्या.
यांनी मिळवली बक्षिसे
पुरणपोळी स्पर्धा प्रथम प्रतिभा चौधरी ,द्वितीय नयना पाटील , मंगल सोनवणे , झोक्यावरचे गाणे प्रथम जोडी मेघना पवार ,दीपिका पाटील , द्वितीय रेखा भागवत पूजा अधिकार , तृतीय कविता पाटील योगिता पांडे, उखाणे वेशभूषा स्पर्धा विजयाताई पाटील , द्वितीय पल्लवी पुरुषोत्तम पाटील , तृतीय राजश्री मनोहर नेरकर , आरास स्पर्धा प्रथम जिजाऊ ग्रुप , द्वितीय स्वामी समर्थ ग्रुप , तृतीय धनदायी मंडळ , घटयावरील गाणे प्रथम रंजना महाजन ,चित्रकला महाजन द्वितीय आशा दुसाने, लता दुसाने ,तृतीय श्यामल पाटील ,कल्पना देवरे यांनी बक्षिसे मिळवली
परीक्षक म्हणून वसुंधरा लांडगे , प्रा शीला पाटील , लीना पाटील , सुरेखा बाविस्कर , दर्शना पवार ,बोरकर , लिलाबाई प्रकाश पाटील , विमलबाई पाटील ,उषा पाटील , पद्मजा पाटील यांनी काम पाहिले. सुत्रसंचालन सानेगुरुजी शिक्षक साहित्य संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील , पूनम बेडसे यांनी तर आभार उमेश काटे यांनी मानले.
हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष सुनीता पाटील , वाल्मिक मराठे , कुणाल पवार , मनोहर नेरकर , रेखा मराठे , छाया इसे , रत्नाकर पाटील , अशोक पाटील ,सीमा रगडे, गोपाल हडपे ,रामकृष्ण बाविस्कर , शरद पाटील , रामेश्वर भदाणे , प्रदीप कंखरे , विलास बिरारी , जी डी पाटील , रमेश धनगर , अनिल पाटील ,निरंजन पेंढारे , मनोज ठाकरे , चंद्रकांत पाटील , सीमा पाटील ,पूजा पाटील ,नूतन पाटील , ज्ञानेश्री पाटील , कल्पना पाटील , सारिका पाटील तसेच एलआयसी कॉलनी , माऊली जल , अंबिका फोटो यांचे सहकार्य लाभले.




