
अमळनेर : बंद घराचा कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्यानी घरातील सुमारे ७० हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लांबवल्याची घटना ८ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान अमळनेर येथील पिंपळे रस्त्यावरील समर्थ नगर मध्ये घडली.

हेमंत प्रकाश विसपुते हे त्यांच्या वडिलांच्या कमरेच्या ऑपरेशन साठी ८ रोजी रात्री घराला कुलूप लावून नाशिक येथे गेले होते. १२ रोजी त्यांना शेजारच्याने फोन करून कळवले की तुमच्या घराचा दरवाजा उघडा असून कडी कोंडा तोडलेले आहे. मात्र दवाखाण्यात असल्याने त्यांना घरी येता आले नाही. १४ रोजी ते घरी आले असता त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले.देवघरात चांदीचे देव नव्हते. त्यांनतर त्यांनी घरातील वस्तू तपासून पाहिल्या असता त्यांना ५० हजार रुपये किमतीचे ४ ग्राम सोन्याचे काफ , ८ हजार रुपये किमतीची १० भार चांदीची लक्ष्मीची मूर्ती , ८ हजार रुपये किमतीची १० ग्राम वजनाची गणेशाची मूर्ती , १६०० रुपये किमतीची दोनभार वजनाची चांदीची समयी २४००रुपये किमतीची ३ भार वजनाचे चांदीचे फुलपात्र असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचे उघडकीस आले.
१९ रोजी मालकाने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलिसात अज्ञात छोट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.




