
महसूल विभागाचे नागरिकांना शांतता व सहकार्याचे आवाहन
अमळनेर : तालुक्यात कुठेही पेट्रोलची टंचाई नसून माल सम्पल्यानंतर पंप एक दोन दिवस बंद राहत असल्याने ग्राहकांमध्ये गैरसमज पसरून विनाकारण जादा पेट्रोल भरण्यासाठी गर्दी होत असल्याने इतरांना टंचाईचा भास होत आहे.

शहरातील प्रशांत निकम यांचा शिव पेट्रोल पंप बाबत सायबर क्राईम च्या तक्रारी गेल्याने त्यांची तीन खाती सायबर गुन्हे शाखेने बंद केल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे त्यांना रोखीने पेट्रोल मागवता येत नसल्याने त्यांनी पंप बंद ठेवला आहे. त्याचप्रमाणे पेट्रोल पंपाना ठरलेल्या दिवसांप्रमाणे मर्यादित साठा देण्यात येतो. त्यामुळे एखादा पंप बंद असला तर दुसऱ्यावर गर्दी पडते आणि पेट्रोल संपते. प्रत्येकाला रुग्णवाहिका , पोलिस आणि प्रशासकीय वाहनांसाठी अत्यावश्यक साठा राखून ठेवण्याचे आदेश असल्याने ते प्रत्येकवेळी राखीव पेट्रोल ठेवतात मात्र ग्राहक पेट्रोल असून देत नाही म्हणून गैरसमज पसरवतात आणि वरिष्ठांकडे तक्रारी करतात. सुरुवातीला नायरा पंपावर पेट्रोल होते. आर के पेट्रोल पंप बंद होते आता नायरा चे संपले आर के चे दोन्ही पंप सुरू आहेत. बोहरी पंपावर पेट्रोल वाटप सुरू आहे. नायरा चे पेट्रोल मुंबईवरून येते. प्रत्येकाला कोटा ठरवून दिला असल्याने तितक्या दिवसानंतर तितकेच पेट्रोल येते. मात्र ग्राहक गरजेपेक्षा जास्त पेट्रोल भरून घेत असल्याने इतरांना त्रास होत आहे.
नागरिकांनी पॅनिक होऊ नये आणि गैरसमजाला बळी पडू नये. एखाद्या पंपावरील पेट्रोल संपले तरी इतर पंपावर लगेच पेट्रोल येते. पंपांवर जाऊन प्रत्यक्ष तपासणी केली आहे. काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील दिला आहे. संपले तरी लगेच पेट्रोल उपलब्ध होत आहे. वरिष्ठ पातळीवरून काहीही बंदी नाही- रुकसाना शेख , पुरवठा निरीक्षण अधिकारी अमळनेर




