
तालुक्यात वाढत्या आगीमुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान…
अमळनेर : २२ रोजी लोण पंचम शिवारात दुपारी तीन वाजेच्या सुमारास संजय प्रल्हाद पाटील यांच्या गट नम्बर ७ मधील शेतात आग लागली. निलेश वानखेडे यांनी कळवल्यावर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले मात्र तोपर्यंत १ हेक्टर ६३ आर क्षेत्रातील १५० ते २०० क्विंटल मका आणि गुरांचा चारा जळून खाक झाला. सुमारे साडे तीन लाख रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

२३ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मंगरूळ येथील कल्पना पाटील ,दगाजी देवराम पाटील यांच्या पाच ते सहा एकर क्षेत्राला आग लागल्याने शेतातील मका ठिबक नळ्या असे एकूण तीन चार लाख रुपयांचे नुकसान झाले. सरपंच समाधान पारधी ,पोलीस पाटील भागवत पाटील यांनी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना कळवल्यावर अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी , जफर पठाण ,दिनेश बिऱ्हाडे , मच्छीन्द्र चौधरी , वसीम पठाण , लखन कंखरे यांना पाठवण्यात आले. तातडीने आग विझवल्याने पुढील शेतांचे नुकसान झाले आहे.
२३ रोजी दुपारी पावणे दोन वाजता रणाईचे येथे प्रकाश तापिराम पाटील यांच्या शेतात दोन बिघे मक्याला आग लागून दोन लाखाचे नुकसान झाले आहे. तेथेही अग्निशमन दल पोहचले आणि प्रयत्न केले.
सायंकाळी तालुक्यातील झाडी येथे श्याम साहेबराव पाटील यांच्या सबगव्हाण रस्त्यावरील शेतातील पक्क्या घराला अचानक आग लागून ठिबक नळ्या ,चारा , शेती साहित्य जळाले. गावकरी तसेच अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.




