
अमळनेर : संत सखाराम महाराज की जय घोषात सामाजिक ऐक्याचा बारा बलुतेदारांचा अमळनेरचा रथोत्सव उत्साहात सुरू झाला. अभय देव व आरती देव यांच्या हस्ते रथाची पूजा करण्यात आली. हभप प्रसाद महाराज यांच्या हस्ते विठ्ठल रुख्मिनी मंदिरात पूजा करून लालजींची मूर्ती रथावर आणण्यात आली.

सलीम बेलदार या मुस्लिम व्यक्तीला पहिली मोगरी लावण्याचा मान देण्यात आला. संत सखाराम महाराज यांचा मुखवटा व पादुका , विठ्ठल रुख्मिणी , ज्ञानेश्वर , मुक्ताई , तुकाराम महाराज आदीं संतांचे प्रतीक , गरुड आणि हनुमान , नगारखाना , घोडेस्वार , मशालधारी , भालदार चोपदार होते. ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत टाळकरी , वारकरींच्या ज्ञानोबा माऊली च्या घोषात रथ मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. हभप प्रसाद महाराजांच्या हस्ते विश्वस्त , पदाधिकारी , प्रतिष्ठित मान्यवर यांना प्रसाद देण्यात आला. सुरुवातीला काही अंतर दोराने रथ ओढण्यात आला. नंतर ट्रॅक्टर ने सुरुवात झाली. यावेळी आमदार अनिल पाटील, प्रांताधिकारी मयूर भंगाळे , डीवायएसपी विनायक कोते , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , मुख्याधिकारी गणेश शिंदे ,पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , नगराध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर , माजी नगराध्यक्ष विनोद पाटील , माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील , डॉ अनिल शिंदे ,मोहन सातपुते, अनिल महाजन ,पंकज चौधरी , भूषण भदाणे , निलेश भांडारकर ,महेश देशमुख , श्रीराम चौधरी , होमगार्ड समादेशक अरुण चौधरी , नितीन निळे ,गोपी कासार, नरेंद्र संदानशिव , मनोज भांडारकर , उदय देशपांडे ,प्रा सुधीर पाटील , नावेद शेख, हरीश देशमुख , पंकज भोई , बाळू पाटील , नाना धनगर , पवन शेटे ,जितेंद्र देशमुख , ऍड श्याम जाधव , शुभम देशमुख , प्रतिक देशमुख , मयुरेश देशमुख , ,विजय देशमुख ,अनिकेत देशमुख , प्रवीण पाठक , नरेश कांबळे हजर होते.
पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ , हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील , निलेश मोरे , नितिन कापडणे , प्रशांत पाटील , उज्वल म्हस्के , विनोद सोनवणे , कपिल पाटील , जे डी पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. संजय बोरसे , रवींद्र बोरसे या वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियंत्रण करून अवजड वाहनांना रथ रस्त्यावर बंदी घातली.
वाडी चौक , गुरव गल्ली पानखिडकी, सराफ बाजार , दगडी दरवाजा , फरशी रोड , पैलाड ,कसाली मार्गे रथ मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी महाराजांना बोलवण्यात येऊन त्यांची पूजा करण्यात आली. फरशी पुलावर रथ येताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. सकाळी रथ पूर्ववत जागेवर आणण्यात आला.
यंदा प्रथमच रथ मिरवणूक असताना सुद्धा बोरी पात्रात पाळणे अथवा दुकाने सुरू झालेली नव्हती. दुकानांच्या ठेक्याच्या वादात आधीच दोन दिवस उशीर आणि कडक उन्हामुळे मांडणी करणे अवघड जात आहे. त्यामुळे यात्रा सुरू होण्यास यावर्षी उशीर झाला आहे




