
अमळनेर : अवैध रित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ला पकडून पोलिसांनी वाळू व ट्रॅक्टरसह सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना २५ रोजी पहाटे २:१५ मिनिटांनी पातोंडा गावाजवळ अमळनेर रस्त्यावर घडली.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज ,हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार ,हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे , विनोद संदानशिव पेट्रोलिंग करत असताना त्यांना समोरून येणारे ट्रॅक्टर क्रमांक एम एच १९ एपी ८८३२ याच्यावर निलेश रुपचंद् बारेला वेग ३० रा दुगणी ता वरला जिल्हा बडवाणी (म प्र) हा बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करीत असताना अडवला. त्याच्याकडे पोलिसांनी परवाना मागितला तर तो त्याच्याकडे नव्हता पोलिसांनी चालक विरुद्ध भारतीय न्याय संहित कला ३०३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत.




