
अमळनेर – तालुक्यातील मुडी प्र.डां. येथील सरपंच मंदाबाई भाऊराव पाटील यांच्यावर २४ रोजी अविश्वास ठराव पारित करण्यात आला.

२० एप्रिल रोजी सर्वच नऊ सदस्यांनी अविश्वास ठराव मांडला होता. यावेळी ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता नसून मनमानी पद्धतीने कारभार करून निधीचा अपव्यय करण्यात आला आरोप या सदस्यांनी केला होता. नऊच्या नऊ सदस्यांनी अविश्वास ठराव मांडून विशेष सभा बोलावण्याची मागणी तहसीलदारांकडे केली होती. २४ रोजी तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांच्या उपस्थितीत सरपंच मंदाबाई भाऊराव पाटील यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी तलाठी रवी पाटील, ग्रामसेवक विनोद पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच गौरव उदय पाटील, प्रणव सुनील पाटील, हेमंत गुलाबराव पाटील, तुषार गणपत पाटील, संजय युवराज पाटील, उदय वसंत पाटील, काशिनाथ दगा माळी, संजय पाटील, शरद उत्तम पाटील, गणेश चव्हाण, राजेंद्र गणपत पाटील, शांताराम दंगल पाटील, भागवत रामभाऊ कोळी, अनिल आर पाटील, जितेंद्र पाटील, बापू बडगुजर गणेश भोई, हिरालाल बडगुजर तसेच मोठ्या प्रमाणात गावातील स्थानिक नागरिक व युवक उपस्थित होते




