
अमळनेर:- तालुक्यातील दहिवद येथील अविनाश पाटील(वय ४५) यांचा मृतदेह गावातील एका विहिरीत आढळून आल्याची घटना २९ रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली.

अविनाश पाटील हे दहिवद येथील माध्यमिक शाळेत शिक्षक होते.मागील २ दिवसापासून ते घरी नसल्याचे समजते.२९ रोजी त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.मृतदेह जास्त वेळ पाण्यात राहिल्याने मृतदेहाची अवस्था बिकट झालेली होती.त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही.माजी जिल्हा परिषद सदस्या मीनाताई रमेश पाटील यांचे ते सुपुत्र होते.




