
निवडणूक कार्यक्रम जाहीर,4 मे पर्यंत नामनिर्देशन दाखल करण्याची मुदत तर 30 मे रोजी मतदान
अमळनेर:-गेल्या काही वर्षांपासून अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघावर प्रशासक राज असताना मोठ्या प्रतीक्षेनंतर संघाची निवडणूक लागली असून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण,महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

सदर कार्यक्रमानुसार 27 एप्रिल ते 4 मे पर्यंत नामनिर्देशन अर्ज विक्री व दाखल करण्याची मुदत असून आवश्यकता भासल्यास 30 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.एकूण 15 जागांसाठी ही निवडणूक होत असून यात व्यक्तिशः 5,सोसायटी 5,महिला राखीव 2,इमाव 2,अनु जाती/जमाती 1,विजाभज व विमाप्र 1 आदी जागांचा समावेश आहे.निवडणूक निर्णय अधिकारी धर्मराज पाटील(सहा.निबंधक,अमळनेर ) यांच्या नियंत्रणात ही निवडणूक होणार असुन 5 मे रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी,6 मे ला नामनिर्देशन पत्राची सूची प्रसिद्ध होईल.21 मे रोजी चिन्ह वाटप व अंतिम विधीग्राह्य उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल.आवश्यकता भासल्यास 30 मे रोजी मतदान,31 मे ला मतमोजणी त्यानंतर लागलीच निकाल जाहीर होणार आहे.
दरम्यान सदर निवडणूक लागताच राष्ट्रवादी, भाजप,शिवसेना शिंदे गट,काँग्रेस तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने निवडणूकिसाठी व्ह्यूवरचना आखणे सुरू केले असुन इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पक्षाकडे लॉबिंग सुरू केले आहे.तर काहींकडून निवडणूक बीनविरोध करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.अनेक वर्षानंतर ही निवडणूक होत असल्याने व आधीच जि प व प स निवडणूक देखील लांबली असल्याने ग्रामिण कार्यकर्ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक झाले आहेत.आमदार अनिल पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न केल्यास निश्चितच ही निवडणूक बिनविरोध होऊन संघाचा आर्थिक भार कमी होणार आहे.




