
अमळनेर:- जागतीक हिवताप दिनी मुख्यकार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी प्रमोद सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीष गोसावी, तालुका आरोग्य परीवेक्षक प्रशांत फुगे यांच्या मार्गदर्शनाखली प्राथमिक आरोग्य केद्र मारवड येथे हिवताप दिनी मारवड गावात विठठल मंदिर येथे साऊड सिस्टीम माईक व्दारे जनजागृती केली.

हिवताप जनजागृती साठी च्या म्हणी माहिती स्टीकर घरोघरी लावले.माझे गांव आरोग्य संपन्न गांव होण्यासाठी जनजागृती करण्यात आली .समस्त ग्रामस्थांना विठठल मंदिरात एकत्रित बोलवण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून वैदयकीय अधिकारी साहील चौधरी , डॉ. नितीन मराठे आरोग्य सहायक जितेंद् मोरे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी के. आर. साबळे आदी मान्यवर होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैदयकीय अधिकारी साहिल चौधरी होते. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत योगेश कापडणे यांनी हिवताप दिना चा या वर्षाचे घोष वाक्य “हिवताप दुरीकरणसाठी कठीबंद:- आता हे शक्य आहे आत हे केलेच पाहीजे” “Driven to end Malaria: Now We Can Now We Must ” या घोष वाक्याने केली . हिवताप दिनाची सुरवात केली. केद्रसरकारच्या ध्येय धोरणानुसार “राष्ट्रीय हिवताप दुरीकरण कार्यक्रम सन 2030 हिवताप दुरीकरण ध्येय ठेवले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) २००८ मध्ये सर्वप्रथम हा दिवस साजरा केला. त्यापूर्वी २५ एप्रिल हा दिवस केवळ ‘आफ्रिकन हिवताप दिवस’ म्हणून ओळखला जात असे. २००७ मध्ये आयोजित जागतिक आरोग्य परिषदेत हिवतापाचा जागतिक प्रादुर्भाव या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले. परिणामी हा दिवस ‘जागतिक हिवताप दिवस’ म्हणून ओळखण्यात यावा, असा ठराव सदर परिषदेत मांडण्यात आला. तेव्हापासून हिवतापाची कारणे, उपचार आणि प्रतिबंध यांबद्दल सामाजिक जागृती करणे आणि संपूर्ण जगभरात हिवतापाविरुद्ध चाललेल्या मोहिमेचा आढावा घेणे, ही जागतिक हिवताप दिवस साजरा करण्यामागील उद्दिष्टे ठरवण्यात आली.साधनांद्वारे जागृतीसंदेश सर्वदूर प्रसारित करण्यात येतात. आरोग्य सहायक जितेंद्र मोरे यांनी हिवताप प्रतिबंधात्मक उपाय सांगीतले. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी के आर साबळे यांनी ताप रुग्णाचा रक्त नमुना कसा घ्यावा या बाबत आरोग्य कर्मचा-यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षयी भाषणात वैदयकीय अधिकारी डॉ. साहील चौधरी यांनी मलेरीयाची लक्षणे व प्राथमिक उपचार संदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन योगेश कापडणे यांनी केले व आभार आशासेविका संगीता चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वैदयकीय अधिकारी साहील चौधरी, डॉ. विदया देवरे, डॉ. नितीन मराठे आरोग्य साहयक जितेंद्र मोरे प्रयोगशाळा वैज्ञानिक के.आर.साबळे आरोग्य सेवक योगेश कापडणे, सेविका –ललीता तिडके, आशा सेविका राजश्री पाटील, संगीता चौधरी आदी मान्यवर उपस्थीत होते.




