
अमळनेर : पेव्हर ब्लॉकचे १२ लाख रुपयांचे बिल मंजूर केल्याप्रकरणी ५० हजार रुपयांची लाच घेताना नगाव येथील ग्रामसेवक रवींद्र देविदास पवार यांना ३० रोजी केलेनगर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

नगाव बुद्रुक येथील गटारीचे व पेव्हर ब्लॉक चे १२ लाख रुपयांचे बिल मंजूर केले म्हणून ग्रामविकास अधिकारी रवींद्र पवार यांनी ७ टक्के प्रमाणे ८४ हजार रुपये कमिशन ची मागणी केली होती. तक्रारदाराने ३० रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३० रोजी तक्रार केली. पैकी १३०० रुपये ग्रामविकास अधिकारी याने आधीच फोन पे वर स्वीकारले होते. ढेकू रस्त्यावरील केलेनगर येथील स्वतःच्या घरी ग्रामविकास अधिकारी पवार याने तडजोड अंतर्गत ५० हजार रुपये स्वीकारले आणि सापळ्यात अडकला.
लाचलुचपत विभागाचे डीवायएसपी योगेश ठाकूर , सापळा अधिकरी हेमंत नागरे , स्मिता नवघरे , दिनेशसिंग पाटील,सुरेश पाटील , बाळू मराठे , किशोर महाजन , सुनील वानखेडे ,भूषण पाटील , मनोज पाटील ,प्रणेश ठाकूर , अमोल सूर्यवंशी , सचिन चाटे यांनी ही कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणे सुरू होते.




