
अमळनेर(प्रतिनिधी):- शहरातील बहादरपूर नाका परिसरात गाडीला कट मारल्याच्या कारणावरून राग येऊन वडील व मुलासहित तिघांना मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी संजय बाविस्कर यांचा मुलगा ३ मे रोजी पायी दिंडीत फिरत असतांना पैलाड भागात राहणाऱ्या दीपक हिरा भोई याने कट मारला, कट मारल्याच्या जाब विचारल्याने दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
रात्री १० बाजेच्या दरम्यान फिर्यादी,त्यांचा भाऊ व मुलगा घरी जेवण करत असताना मुलाच्या मोबाईलवर रवींद्र कैलास कोळी याने फोन करून तिघांना बहादरपूर नाक्यावर बोलावून कट मारल्याच्या भांडण पुन्हा उकरून काढले.
यावेळी फिर्यादी संजय बाविस्कर,योगेश रतीलाल बाविस्कर व मुलगा या तिघांना निलेश भोई,विकी भोई, रविंद्र कोळी व दीपक भोई या चौघांनी रोखंडी रॉड,लाकडी दांडा तसेच चाकूने हातावर व डोक्यावर वार करून जखमी केले,अमळनेर पोलिस स्टेशन येथे चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउनी शरद काकळीज करीत आहेत.




