
Oplus_131072
अमळनेर:- शहरातील कचेरी रोडवरील रस्त्यात पडलेली माती अखेर उचलण्यात आली, परंतु अपघाताचे मुख्य कारण असलेली वाळू मात्र तशीच रस्त्यावर सोडून देण्यात आल्याने पुन्हा त्या वाळूमुळे एका पती-पत्नीचा गंभीर अपघात झाला.
दुचाकीचे चाक वाळूवर घसरल्याने दोघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात महिला गंभीर जखमी झाल्या. त्या काही वेळ बेशुद्ध अवस्थेत होत्या. त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली असून रक्तस्राव थांबत नव्हता.शरीराच्या विविध भागांना देखील गंभीर मार लागला.तर पुरुषाला पाय, गुडघा आणि अंगठ्याला मोठ्या जखमा झाल्या. अपघातानंतर काही काळ दोघांनाही हालचाल करणे शक्य नव्हते. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांना दवाखान्यात दाखल करण्यात आले असून एखाद्याचा बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येईल का असा सवाल नागरिकांनी केला आहे




