
Oplus_131072
राजपूत एकता मंचची बैठक संपन्न, समितीची स्थापना,
अमळनेर:-येत्या 17 जून 2026 रोजी महाराणा प्रताप जयंती उत्सव राजपूत एकता मंचतर्फे उत्साहात साजरा होणार असून याचे नियोजन करण्यासाठी समाज बांधवांची बैठक दिनांक 5 जून रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
जयंती उत्सव भव्य व यशस्वी करण्यासाठी बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.उत्सवाच्या नियोजनासाठी विविध जबाबदाऱ्या निश्चित करून समितीची स्थापना करण्यात आली. समितीच्या माध्यमातून जयंती उत्सवाचे सर्व कार्यक्रम सुयोग्य पद्धतीने पार पाडण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.बैठकीच्या प्रारंभी समाजाचे ज्येष्ठ व मान्यवर यांच्या हस्ते राजपूत एकता मंचचे अध्यक्ष रणजित भीमसिंह पाटील (खोखरपाट) यांचा शेतकी संघ निवडणुकीत विजय संपादन केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच नितीन इंद्रसिंग राजपूत (खोखरपाट) यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. उपस्थितांनी दोन्ही मान्यवरांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
बैठकीस मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने यंदाचा महाराणा प्रताप जयंती उत्सव अधिक भव्य, प्रेरणादायी व यशस्वी करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.




