
अमळनेर : शहरातील पारधीवाडा भागात पोलिसांनी एकाच्या घरात छापा टाकून तलवार जप्त केल्याची घटना ५ रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम याना गोपनीय माहिती मिळाली की , सुभाष चौकातील पारधीवाडा येथे समाधान उर्फ दादू संतोष पाटील (मराठे) यांच्याकडे तलवार आहे. त्यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड , सुनील तेली , प्रशांत पाटील , मोनिका पाटील यांना छापा मारण्यास पाठवले. समाधान उर्फ दादू घरी नव्हता पोलिसांनी त्याच्या आईची परवानगी घेऊन घरात झडती घेतली असता त्यांना एक तलवार आढळून आली. उज्वलकुमार म्हस्के यांच्या फिर्यादीवरून शस्र अधिनियम १९५९ च्या कलम ४,२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील तेली करीत आहेत.




