
अमळनेर : बनावट मुद्रांक खरा म्हणून वापर करून शासनास फसवले म्हणून तिघांविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१२ जून २०२५ रोजी दुपारी १ वाजता अमळनेर तहसील कार्यालयात अव्वल कारकून अनिल परदेशी यांच्याकडे वीरेंद्र राजेंद्र सोनवणे रा गंगापुरी ता धरणगाव , कविता पंडित भिल रा सत्रासेन ता चोपडा ,राजेंद्र जगन्नाथ जोशी रा अमळगाव असे अंतूर्लीकर विवाह मंडळाच्या विवाह सत्यतेसाठी १०० रुपयांचे प्रतिज्ञापत्र ऑनलायीन नोंदणीकरून शिक्का मारून सहीसाठी आले होते. अनिल परदेशी यांनी ते प्रमाणित केले होते. २० एप्रिल २०२६ रोजी ऍड अभिजित बिऱ्हाडे यांनी कलर झेरॉक्स वर बेकायदेशीर प्रतिज्ञापत्र केल्याबद्दल पोलिसात तक्रार केली होती. त्याची चौकशी नायब तहसीलदार ए पी कुलकर्णी यांच्यातर्फे करण्यात आली. चौकशीत तिघाना मूळ प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्यांनी मूळ स्टॅम्प सादर केला नाही आणि खुलासाही सादर केला नाही म्हणून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी अनिल परदेशी याना प्राधिकृत केल्याने त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम ३१८ व ३४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.




