कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराबद्दल संघटनेच्या वतीने दिले निवेदन…
अमळनेर:- येथे ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचा मेळावा पार पडला असून त्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
अमळनेर येथील ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी 45 11 यांचा तालुका मेळावा घेण्यात आला. यावेळी तालुक्यातील किमान शंभर कर्मचारी उपस्थित होते. तसेच पंचायत समितीचे ग्राम विस्तार अधिकारी एल डी चिंचोरे यांना संघटनेच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराबद्दल निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, तालुका अध्यक्ष नरेंद्र पाटील, तालुका सचिव सुभाष नाना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तालुका उपाध्यक्ष रवि पाटील, जिल्हा सचिव प्रदिप महाजन, पं.स. लिपीक अनिल पाटील यासह तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.