१३ जुलै रोजी अमळनेरात धरणे आंदोलन करत वेधणार लक्ष…
अमळनेर:- वीजबिल दरवाढीविरोधात आम आदमी पक्षातर्फे १३ जुलै रोजी अमळनेरात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
आम आदमी पार्टीच्या वतीने वीज बिलवाढी विरुद्ध जोरदार रणशिंग फुंकले असून १३ जुलै रोजी राज्यभर ग्रामीण भागासह शहर व जिल्हा केंद्रावर सकाळी ११ ते ५ या वेळेत धरणे, निदर्शन व आंदोलन करण्यात येणार आहे. अमळनेर येथे बस स्थानक समोरील डॉ रुपेश संचेती यांच्या कार्यालयापासून मोर्चा सुरू होऊन डाकबंगला समोरील महाराणा प्रताप चौकात धरणे धरण्यात येणार आहे. लोकांच्या हितासाठी असलेल्या या लढ्यात महिला, पुरुष व विद्यार्थी वर्गाने देखील सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र संयोजक रंगा राजुरे, महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे, जिल्हा संयोजक प्रा. तुषार निकम, अमळनेर तालुका संयोजक संतोष बाबुराव पाटील, सल्लागार डॉ रुपेश संचेती, प्रदेश शेतकरी आघाडी नेते शिवाजीराव पाटील, धनंजय सोनार यांनी केले आहे.