शेतात खाली आलेल्या विजेच्या तारांशी संपर्क झाल्याने घडली दुर्घटना…
अमळनेर:- तालुक्यातील फापोरे येथे शेतात काम करणाऱ्या १८ वर्षीय तरुणाचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल १२ जुलै रोजी घडली आहे.
सदर तरुणाचे नाव राहुल हिलाल मोरे असून तो शेतात खत लावत असताना खाली लोंबकणाऱ्या विजेच्या तारांचा त्याच्या गळ्याला स्पर्श झाला. त्याला जोरदार शॉक लागल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. अमळनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबीयांनी टाहो फोडला होता. तसेच गावात ही शोककळा पसरली आहे. महावितरणच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचे सांगत ग्रामस्थात संताप व्यक्त होत असून परिवारास मदतीची मागणी केली जात आहे.