
रशियातून एमबीबीएस, एमडीची पदवी घेऊन उत्तीर्ण…
अमळनेर:- येथील पेंशनर शिक्षक पुरुषोत्तम सोनु पवार, मुळगाव पातोंडे, ह.मु.अमळनेर यांची नात व वैशाली आणि राजेंद्र पवार यांची सुकन्या सायली राजेंद्र पवारने रशिया येथून एमबीबीएस, एमडी (फिजिशीयन) पदवी मिळवली व
अलीकडे 4 जून 2022 रोजी झालेल्या एफ.एम.जी.ई(फॉरेन
मेडिकल ग्रॅज्युएट एग्झामिनेशन) परीक्षेत घवघवीत यश मिळवले व आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

डॉ.सायली ही प्रताप महाविद्यालय, साने गुरुजी कन्या हायस्कूल व साई इंग्लिश अकॅडमि या कोचिंग क्लासेसची माजी विद्यार्थिनी आहे. सामान्य कुटुंबातून वाढलेली डॉ.सायलीने मिळवलेले हे यश खरोखरच वाखाणण्याजोगे आहे.तिच्या या घवघवीत यशामुळे अमळनेर नगरीचे आमदार अनिल भाईदास पाटील तसेच माजी आमदार साहेबराव पाटील,तसेच कोचिंग क्लासेस संघटना PTA , म.वा. मंडळ, भगवा चौक मित्र मंडळ, अमळनेर तालुका मराठा समाज, पाटील कॉलनी, पटवारी कॉलनी परिसर रहिवासी,अमळनेर यांनी डॉ.सायलीचे कौतुक केले आहे.







