अमळनेर:- तालुक्यातील दहिवद विकास सोसायटी निवडणुकीत बळीराजा पॅनलने विजय मिळवला असून पॅनलचे नेतृत्व प्रवीण माळी यांनी केले.
दहिवद गावाचा राजकीय इतिहासात पहिल्यांदाच माळी समाजाकडे नेतृत्वाची धुरा देत प्रवीणआबा माळी यांनी नेतृत्व केले. गावातील मराठा समाजाने देखील प्रवीणआबाच्या नेतृत्वाला साथ दिली. दिनेशजी पाटील यांनी गावातील संपूर्ण समाजाची तसेच इतर समाजाची मदत प्रवीण माळी यांच्यामागे उभी केली. यात अलका संजय पाटील, सुनीता नाना पाटील या महिला सदस्यांनी देखील मोठी साथ दिली. तसेच राजेंद्र पांडुरंग पाटील, ईश्वर गिरधर माळी,संजय भगवान माळी, शांताराम शेनपडू माळी, सुरेश लखा माळी,सुरेश निळकंठ माळी, जगदीश शांताराम देसले, अशोक साहेबराव पाटील,रणजित सुधाकर पाटील, गुलाब नवल धनगर, जोगीलाल उखरडू पारधी (बिनविरोध) हे उमेदवार विजयी झाले. यामुळे प्रवीणआबा यांच्या बळीराजा पॅनलचे सर्व उमेदवार तीन पट मतांनी विजयी झाले.तर लोकनियुक्त सरपंच सुषमा वासुदेव पाटील यांच्या पॅनलचे संपूर्ण उमेदवार पराभूत झाले. माजी जि.प. सदस्य ए.टी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले, तर सुभाष देसले, गोकुळ माळी, जयवंत पाटील, शिवाजी काशिनाथ माळी, अनिल माळी, पन्नालाल मावळे, शिवाजी पारधी (गटनेते ग्रा.प.)तसेच दहिवद खुर्दचे शिरीष पाटील, हिरालाल पाटील, विनोद पाटील यांनी ही अनोखी युती यशस्वी करुन दाखवली. उपसरपंच देवानंद कपूरचद बहारे यांच्या सह 12 ग्रामपंचायत सदस्यांनी पाठिंबा दिला तसेच दहिवद व दहिवद खुर्द गावातील राजकीय, सामाजिक प्रतिनिधी व ग्रामस्थ यांनी प्रयत्न केले. गाव करी ते राव काय करी असं म्हणतात, म्हणून गावातील लोकांच्या मताप्रमाणे प्रवीणआबा पुढील गाव विकासाचे नेतृत्व करतील आणि सर्वांची साथ असेल असे दिनेशजी पाटील यांनी म्हटले आहे.