अमळनेर:- येथील अमळनेर पोलीसात दाखल विविध गुन्ह्यात जप्त झालेला मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादींना परत करण्यात आला.
काल दिनांक २२ जुलै रोजी अमळनेर पोलीस ठाण्याच्या आवारात अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या उपस्थितीत पो. नि. जयपाल हिरे यांनी विविध गुन्ह्यात जप्त मुद्देमाल परत केला. यात जगदीश सोनवणे यांचा ४५ हजाराचा ऐवज, राजेंद्र भावसार यांचा ७५ हजाराचा ऐवज, छोटू वैदू यांचा ४० हजाराचा ऐवज, व अतिश अमृतकर यांचा ७५ हजाराचा ऐवज परत करण्यात आला. अमळनेर पोलिसांच्या कार्यतत्परतेने मूळ मालकांना आपले दागिने व ऐवज मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.