अमळनेर:- येथील मुंदडा ग्लोबल स्कूल येथे कायदेविषयक शिबीर उत्साहात संपन्न झाले.
मुंदडा फाउंडेशन संचलित एन टी मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कुल येथे २२ जुलै रोजी तालुका विधी सेवा समिती, तथा जिल्हा न्यायाधीश १ व अति सत्र न्यायाधीश, अमळनेर यांनी आयोजन केलेले कायदेविषयक शिबिर संपन्न झाले. सदर शिबीरात बेटी बचाव बेटी पढावो, लैगिक गुन्हयांपासून बालकांचे संरक्षण, कायद्यासंबंधी मार्गदर्शन, सायबर क्राईम व मुलांचे अधिकार व शिक्षणाचा अधिकार या विषयांवर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. सदर मार्गदर्शनासाठी श्रीमती एस. एस. जोंधळे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश क, स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग ॲड. के. आर. बागुल, सहा. सरकारी अभियाक्ता, अमळनेर व ॲड. दिपक बी सोनवणे सदस्य , वकील संघ हे उपस्थित होते. सदर शिबीरात इयत्ता ८ ते १० वीच्या विद्यार्थी व विद्यार्थीनीना सायबर क्राईम व लैंगिक गुन्हयांपासून बचाव करणे त्या संदर्भात तक्रार कशी व कोणाकडे करणे या विषयक योग्य ती माहिती देण्यात आली. सदर उपस्थित मान्यवरांचे शाळेचे प्राचार्य लक्ष्मण यांनी पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले व सुत्र संचालन राकेश शर्मा सर यांनी केले.