१३ पैकी १० उमेदवार विजयी झाल्याने मिळवली एकहाती सत्ता…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड विविध कार्यकारी संस्थेच्या निवडणूकीत शेतकरी विकास पॅनलने बाजी मारली असून १० उमेदवार विजयी झाले आहेत.
मारवड येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची सन २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक निवडणूकीत शेतकरी विकास पॅनल व शेतकरी प्रगती पॅनल असे गट समोरासमोर होते. निवडणुकीच्या आधी बिनविरोध करण्याचा ही प्रयत्न झाला होता. मात्र थोडक्यात बिनसल्याने दोन गट उभे ठाकले. दि. २४ रोजी मतदान होवून संध्याकाळी ५:३० वाजता निकाल जाहीर करण्यात आला. यात अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात एकनाथ ओंकार बाविस्कर, महिला राखीव प्रवर्गात आनंदीबाई भिका चौधरी व ताराबाई वसंतराव पाटील, गोवर्धन येथील सर्वसाधारण जागेवर गुलाब गंगाराम पाटील, बोरगाव येथील सर्वसाधारण प्रवर्गात सुदाम शामराव शिंदे, वि.जा.भ.ज.व विमाप्र प्रवर्गात पंकज कांतीलाल लोहार, इतर मागास प्रवर्गात शरद वामनराव पाटील हे उमेदवार निवडून आले. तसेच मारवड येथील सर्वसाधारण मतदारसंघात राकेश गोविंदराव मुंदडा, संजय भगवान पाटील, दिलीप गुलाबराव पाटील, संजय पूना पाटील, अनिल साहेबराव पाटील, उमेश जिजाबराव सुर्वे हे उमेदवार निवडून आले आहेत. यात शेतकरी विकास पॅनलने १३ पैकी १० जागा काबीज करत एकहाती विजय मिळवला आहे. विजयी उमेदवारांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.