अमळनेर:- तालुक्यातील निंभोरा येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणूकीत सहकार पॅनलने संपूर्ण १३ जागा जिंकत विरोधकांचा सुपडा साफ केला आहे.
रविवार २४ जुलै रोजी झालेल्या निंभोरा येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणूकीत सहकार पॅनल व परिवर्तन पॅनल हे समोरासमोर होते. कृषिभूषण सुरेश पिरन पाटील यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलने या निवडणुकीत एकहाती सत्ता काबीज केली आहे. यात इतर मागास प्रवर्गात हिम्मत चिमणराव पाटील, भ.वि.ज.वि.मा. प्रवर्गात उषाबाई शिवाजी धनगर, महिला राखीव प्रवर्गात छायाबाई अनिल पाटील व रजुबाई भगवान पाटील, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात राजेंद्र दामू वाडेकर, तसेच सर्वसाधारण जनरल प्रवर्गात सुरेश पिरण पाटील, राजेंद्र गंभीर पाटील, जगदीश देविदास पाटील, कैलास रतन पाटील, सुनंदा जिजाबराव पाटील, बाजीराव नत्थु पाटील, रतीलाल धनगर कोळी, उषाबाई रघुनाथ कोळी हे उमेदवार निवडून आले आहेत. सर्व सभासदांनी मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवल्याने सुरेश पाटील व सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी आभार व्यक्त केले आहेत.कृषिभूषण सुरेश पिरन पाटील यांच्या नेतृत्वात निंभोरा विकासोवर ३७ वर्षापासून सत्ता अबाधित ठेवली असून तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.