चेअरमनपदी प्रविण गोसावी यांची सर्वानुमते झाली निवड…
अमळनेर:- तालुक्यातील नगांव बु, नगांव खु, धुपी गृप विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली असून ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
प.स सदस्य विनोद नामदेव जाधव, महेश आत्माराम पाटील, पद्माकर रामदासगीर गोसावी, प्रविण रामपुरी गोसावी, दिनेश गुलाबराव पाटील यांनी शेतकरी बांधवांचे हित लक्षात घेता सालाबादाप्रमाणे निवडणूक बिनविरोध करावी म्हणून विशेष पुढाकार घेतला. सर्व गावक-यांच्या सहकार्याने गावात शांतता व जातीय सलोखा राहावा म्हणून निवडणूक बिनविरोध पार पडली. प्रथम चेअरमन पदासाठी प्रविण रामपुरी गोसावी, व्हाइस चेअरमण पदासाठी चुडामण काशीराम पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. सर्वसाधारण प्रवर्गात महेश आत्माराम पाटील, किरण भरतगीर गोसावी, पुंजू पंडीत कुंभार, गणेशगीर वनागीर गोसावी, मोतीलाल भुकन पाटील, प्रकाश एलचंद पाटील महिला राखीव मतदार संघात वंदना रावसाहेब पाटील, व शोभाबाई प्रभाकर पाटील, इतर मागासवर्गीय प्रवर्गात तुषार नारायण पाटील, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात दगडू आनंदा बागले, भ.ज.व.विमा प्रवर्गात पद्माकर रामदासगीर गोसावी यांची निवड झाली. सर्व निवडून आलेल्या सर्व संचालक मंडळाचे समस्त ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी महाजन व सचिव वाणी आप्पा यांचे सहकार्य लाभले.