सागर मोरे
अमळनेर:- ग्रामपंचायतीत आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या ऑनलाईन सेवा देणाऱ्या संगणक परिचालक यांच्या जळगाव जिल्हा संगणक परिचालक संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी लोण येथील अशोक पाटील यांची निवड करण्यात आली. ते सद्यस्थितीत अमळनेर तालुक्याच्या अध्यक्षपदी काम पाहत होते. त्यांनी आजपर्यंत संगणक परिचालक यांच्या विविध मागण्यांसाठी व कल्याणासाठी चांगले कार्य केलेले असून संगणक परिचाकांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ते संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करत असल्याने जिल्हा संघटनेने त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली.
संगणक परिचालक यांचे थकीत मानधन,त्यांच्यावर विविध कामे लादणे, त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून सामावून घेणे व इतर प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मी कायम तत्पर राहणार असल्याचे अशोक पाटील यांनी निवडीप्रसंगी सांगितले.त्यांच्या निवडीचे अमळनेर तालुका संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.