अमळनेर:- तालुक्यातील शिरसाळे येथे गावठी दारू विक्री करणाऱ्या एकावर मारवड पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिरसाळे येथे गावठी दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्याने मारवड पोलिसांच्या पथकाने पाहणी केली असता चुडामन आधार कोळी हा झाडी रस्त्याला शेतात नाल्यालगत प्लास्टिकचा ड्रम घेवून बसलेला दिसून आला. त्याला पोलिसांची चाहूल लागल्याने तो पळून गेला. त्या ठिकाणी १२०० रुपये किमतीची ३० लिटर दारू आढळून आल्याने नमुने घेवून मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला. सदर आरोपीविरुद्ध मुं.प्रो. ॲक्ट ६५ (ई) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एएसआय राजेंद्र पाटील हे करीत आहेत