धरणगाव येथे गृहनिर्माण अभियंता म्हणून होता कार्यरत…
अमळनेर:- शहरातील देशमुख बंगला परिसरात राहणारा व धरणगाव पंचायत समिती गृहनिर्माण अभियंता म्हणून मानधन तत्वावर कार्यरत असणाऱ्या शुभमचा शुक्रवारी रात्री अपघाती मृत्यू झाला.
शुभम संजय सोनवणे (वय २५) असे या तरुणाचे नाव असून तो धरणगाव पंचायत समितीत २०१९ पासून ग्रामीण गृहनिर्माण अभियंता पदावर मानधन तत्वावर काम करत होता. शुक्रवारी ५ ऑगस्ट रोजी धरणगाव येथून कामकाज आटोपून घरी जात असताना रात्री आठ वाजेच्या सुमारास म्हसले गावाजवळ पावसामुळे दुचाकी स्लीप झाल्याने डोक्याला मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ, बहिण परिवार असून घरची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. शुभम मानधन तत्वावर कार्यरत असल्याने त्याला शासकीय सवलती नव्हत्या मात्र त्याच्यावर सर्व जबाबदाऱ्या असल्याने कुटुंबाची वाताहत होऊ नये, याकरिता शासनातर्फे मदत मिळावी अशी मागणी नातेवाईक, सहकारी व मित्रपरिवाराने केली आहे.