
दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण ? ग्रामस्थांचा सवाल…
अमळनेर:- तालुक्यातील फापोरे येथील जि. प. शाळेच्या इमारतीची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून दुर्घटना घडल्यास कोणाला जबाबदार धरावे असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.

फापोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत पूर्णपणे जिर्ण झाली असून ती कधीही कोसळेल हे सांगता येत नाही. शाळा व्यवस्थापन समिती कडून पंचायत समितीत यांना त्याबाबत प्रस्ताव सादर केला असून अजून त्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही. ती इमारत पाडून त्याजागी नवीन इमारत बांधून मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आल्याने ग्रामस्थ व पालकांचा संताप होत आहे. तरी भविष्यात कुठल्याही प्रकारची हानी झाल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार कोण हा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. तरी संबंधित इमारत पाडून त्या जागी कमीत कमी दोन खोल्या जिल्हा परिषद शाळेसाठी तातडीने बांधुन मिळाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून मागणी मान्य न झाल्यास सवैधानिक मार्गाने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.







