अमळनेर:- तालुक्यातील मारवड पोलिसांनी सट्टा घेणाऱ्या एकावर कारवाई केली आहे.
माळन नदीकाठी कैलास भास्कर भालेराव (रा. तळेगाव ता. चाळीसगाव ह.मू. गोवर्धन) हा इसम स्वतःच्या फायद्याकरिता कल्याण नावाचा सट्टा घेत असताना मारवड पोलिसांनी त्यास रंगेहाथ पकडले. त्याचेकडून सट्टा जुगाराचे साहित्य, ३७० रुपये रोख मिळून आले असून मु. जु. अँक्ट १२ (अ) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.