
एलसीबी व मारवड पोलिसांची संयुक्त कारवाई…
अमळनेर:- तालुक्यातील मूडी प्र. डांगरी येथे अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांस एलसीबी व मारवड पोलिसांनी रंगेहाथ पकडुन ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोपनीय माहिती मिळाल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पो.ना. प्रवीणकुमार मांडोळे यांनी मारवड पोलीस ठाण्याचे पो ना. भरत गायकवाड यांना सोबत घेत मूडी प्र. डांगरी येथे भेट दिली असता एक इसम निशांत बियर शॉपीच्या बाजूला असलेल्या शेतात झाडाखाली कापडी पिशव्या घेवून बसलेला दिसल्याने त्यास पकडले. बाबुलाल रतन भोई असे त्याचे नाव असून त्याच्याकडून ९८० रू. किमतीच्या टंगो पंच दारूच्या १४ बाटल्या जप्त करण्यात आल्या. सदरहू आरोपीविरुद्ध मारवड पोलीसात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५ ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो. ना. भरत गायकवाड हे करीत आहेत.







