अमळनेर:- तालुक्यातील हिंगोणे सीम येथे गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्यावर मारवड पोलिसांनी कारवाई केली आहे.
एपीआय जयेश खलाने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पीएसआय विनोद पाटील, हे. कॉ. विशाल चव्हाण, पो. ना. सुनील तेली यांच्या पथकाने छापा टाकला असता तापी नदीकाठी गावठी दारू निर्मितीची जिवंत हातभट्टी चालू असल्याचे दिसून आले. पोलिसांची चाहूल लागल्याने हातभट्टी चालक ज्ञानेश्वर गंगाराम कोळी ह्याने काटेरी झुडुपाचा फायदा घेत पळ काढला. सदर ठिकाणी १ हजार रुपये किमतीचे जिवंत हातभट्टीचे साहित्य, १५ हजार रुपये किंमतीचे गावठी दारू निर्मितीचे रसायन नवसागर गूळ मिश्रित साहित्य व ६०० रुपये किमतीची २० लिटर तयार दारू मिळून आली. नमुने घेऊन उरलेल्या साहित्याचा जागीच नाश करण्यात आला. पो. ना. सुनील तेली यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास विशाल चव्हाण हे करीत आहेत.