राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मॅरेथॉनचे आयोजन…
अमळनेर:- राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त २९ रोजी धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय, अमळनेर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. विजयी प्रथम तिन स्पर्धकांना रोख रक्कम, ट्रॉफी व प्रमाणपत्र तर सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे अंतर पुरूषांसाठी ५ कि.मी. व महिलांसाठी ३ कि.मी. राहील. सदर स्पर्धा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, धनदाई महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभाग व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी नाव नोंदण्याची अंतिम तारीख 28 ऑगस्ट सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे तरी इच्छुकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पवार यांनी केले आहे.विशेष बाब म्हणजे स्पर्धेत सर्वात प्रथम नोंदणी करणाऱ्या 75 स्पर्धकांना मोफत टी-शर्ट धनदाई माता एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष नानासाहेब डी डी पाटील, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन के. डी. पाटील व संचालक शैलेंद्र पाटील यांच्यामार्फत देण्यात येणार आहे. त्यासोबत स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धा राष्ट्रीय क्रीडा दीन’ निमित्त २९ ऑगष्ट रोजी सकाळी ७:३० वाजता सुरू होईल, या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शैलेश पाटील 9158466550 व विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. भगवान भालेराव 07517017024 यांच्याशी संपर्क साधावा.