
आ.अनिल पाटलांच्या हस्ते भूमिपूजन,इतर विकास कामांचाही शुभारंभ…
अमळनेर:- मतदारसंघातील शेळावे बु. येथे चिखली नदीवर सुमारे 1 कोटी 55 लक्ष निधीतून साठवण बंधारे आणि विविध विकासकामांचे भुमीपूजन व लोकार्पण आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर साठवण बंधारे निर्मितीची मागणी अनेक वर्षांपासून सुरू असताना आमदार अनिल पाटील यांनी हा विषय गांभीर्याने घेत मृदू आणि जलसंधारण विभागाकडून थेट मंजुरी मिळविल्याने प्रत्यक्ष कामालाच आता सुरुवात झाली आहे. या बंधाऱ्याचा शेतीला मोठा फायदा होऊन ग्रामस्थांना याचा फायदा होणार आहे. यामुळे जल्लोषात या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच 20 लक्ष निधीतून रस्ता काँक्रीटीकरण कामाचे लोकार्पण देखील यावेळी करण्यात आले.
आमदारांचे गावात आगमन होताच मोठ्या थाटात मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की आवश्यक असेल ते बोलेलंच आणि बोलेल ते करेलच हेच आपले ध्येय असून या गावासाठी आणि परिसरासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी जि.प.सदस्य हिम्मत पाटील, कामगार नेते एल.टी नाना पाटील, तरवाड्याचे सरपंच रामकृष्ण पाटील, शेळावे सरपंच किरण पाटील, रत्नपिंप्री उपसरपंच अंकुश भागवत, चिखलोड उपसरपंच भाऊसाहेब पाटील, दगडी सबगव्हाण चे माजी सरपंच नंदू पाटील, माजी सरपंच नाना पाटील, माजी उपसभापती दिपक पाटील, शेळावे ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती पाटील, गोरख पाटील, विनायक पाटील, संजू पाटील, चिखलोड पी.के.पाटील, नवल पाटील, देवाजी पाटील यांच्या सह ग्रामस्थ मंडळ, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.सदर विकास कामांबद्दल ग्रामस्थांनी आमदारांचे आभार व्यक्त केले. दरम्यान आमदार स्थानिक विकास निधी 2021,22 अंतर्गत भिल्ल वस्तीत 15 लक्ष निधीतून सभामंडप बांधणे याकामाचेही भूमीपूजन यावेळी करण्यात आले.







