संकटकालीन परिस्थितीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रशस्तीपत्र प्रदान…
अमळनेर:- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक ने प्रताप महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रम केंद्राचा संकटकालीन परिस्थितीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन महत्वपूर्ण गौरव केला आहे.
दिनांक 24 जून ते 24 जुलै 2022 या कालावधीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अंतिम लेखी परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. “या अंतिम लेखी परीक्षांसाठी प्रताप महाविद्यालयाने मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा आणि पारंपरिक विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी आल्याने तरीही परीक्षांचे उत्तम आयोजन प्रताप महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्राने केले होते. परीक्षा केंद्रावर वर्ग खुल्या मनुष्यबळ यांच्या समस्या तसेच प्रतिकूल पावसाळी वातावरण या सर्व समस्यांवर मात करून आपण परीक्षांचे चांगले आयोजन करून परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या. आपल्या महाविद्यालयातील सर्वांनी मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेत स्वयंस्फूर्तीने व कर्तव्य भावनेने सहभाग नोंदविला. आपण सर्वांनी केलेले हे काम अत्यंत कौतुकास्पद व प्रशंसनीय आहे” असा उल्लेख प्रशस्तीपत्रात करत मुक्त विद्यापीठाने गौरव केला आहे. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी आर शिरोडे, केंद्र संयोजक प्रा. पराग पाटील, सहकेंद्र संयोजक प्रा.अवित पाटील, प्रा. किरण पाटील, सहायक श्री. आर.जी. गुजराथी व कार्यालयीन स्टाफ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विद्यापीठाने व खानदेश शिक्षण मंडळाने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.