सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणपती बाप्पाची आतुरतेने वाट पाहणारे गणेशभक्त यंदाच्या गणेशोत्सव सर्वत्र धूम धडाक्यात साजरा होणार असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील ग्राम पंचायतीच्या सभागृहात सरपंच भरत बिरारी यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न झाली.
पातोंडा हे लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे गाव असून अतिसंवेदनशील म्हणून गावाकडे बघितले जाते. दोन वर्षांच्या कोरोनाच्या निर्बंधामुळे गणेशोत्सव पाहिजे त्या प्रमाणात गणेशभक्तांना साजरा करता आला नव्हता. आता कोरोनाचे सर्व निर्बंध संपले असताना शिंदे सरकारने यंदा गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध लादले नाहीत. त्यामुळे यंदा गणेशभक्त आनंदात असून यंदाचा गणेशोत्सव ते धूम धडाक्यात साजरा करणार आहेत. गणेशोत्सव काळात व विसर्जनाच्या दिवशी मंडळाकडून काही अनुचित प्रकार होणार नाहीत यासाठी आवश्यक ती नियमावली व सूचना शांतता समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक नरसिंह वाघ यांनी सर्व मंडळातील पदाधिकाऱ्यांना गणेशोत्सव काळात व विसर्जनाच्या दिवशी पाळावव्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच मंडळाच्या परवानग्या देखील काढण्याच्या सूचना व इतर आवश्यक बाबींची काळजी देखील घेण्याचे आवाहन केले. यावेळी हवालदार सुनील पाटील, कपिल पाटील, उपसरपंच नितीन पारधी,ग्रा.पं. सदस्य दिलीप बोरसे,किशोर मोरे, घनश्याम पाटील,राजेंद्र यादव, आनंद कुंभार,जितेंद्र पाटील, अनिल पाटील,पंकज पाटील, राकेश पाटील, प्रशांत लांबोळे सह गावातील सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार प्रदर्शन ग्रा.प.सदस्य सोपान लोहार यांनी केले.