महामंडळाच्या धोरणांमुळे विमा प्रतिनिधींना करावा लागतोय समस्यांचा सामना…
अमळनेर:- ऑल इंडिया लियाफी व जॉइंट एक्शन कमिटी यांचे राष्ट्रीय पातळीवर एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर विविध मागण्यांसाठी देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा महामंडळाच्या नव्या धोरणांमुळे विमा प्रतिनिधी समोर अनेक समस्या उभ्या ठाकत असून त्यांच्या निषेधार्थ अखिल भारतीय जीवन विमा महामंडळ विमा प्रतिनिधी संघटना कमिटी यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार आंदोलन सुरू झाले असून पाच सप्टेंबर रोजी एकही विमा प्रतिनिधी विमा कार्यालय उपकार्यालयाची पायरी न चढता काम बंद आंदोलन करण्यात आले.
पॉलिसी धारकांच्या बोनस मध्ये वाढ करा पॉलिसी कर्ज व अन्य वित्तीय व्यवहारावरील व्याजात कपात करा विमाधारकांना चांगली सेवा द्या पाच वर्षावरील बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची मुभा द्या एकाच पॉलिसी धारकाच्या वारंवार व्यवहार करण्यासाठी केवायसी दस्तऐवज बंधनकारक करू नये विमा पॉलिसी वरील जीएसटी काढून टाका विमा प्रतिनिधी यांना सन्मानपूर्वक वागणूक द्या विमा प्रतिनिधींना अंशदायी भविष्य निर्वाह निधी लागू करा विमा पद्धतींचा टर्म विमा वाढवून द्या क्लब सदस्यांसाठी पाच टक्के व्याजदराने गृह कर्ज द्या आदी मागण्यांबाबत केंद्र सरकार व भारतीय जीवन विमा महामंडळाच्या व्यवस्थापनाकडे अनेकदा पाठपुरावा करूनही दाद न दिल्याने अखिल भारतीय स्तरावर विमा प्रतिनिधी यांनी आंदोलन पुकारले आहे.
आंदोलन अंतर्गत एक सप्टेंबर पासून मागण्या मान्य होईपर्यंत विविध टप्पे निश्चित करण्यात आले आहेत त्यानुसार सर्व प्रेरणादायी बैठक आणि प्रशासनासोबत कोणत्याही बैठकीत विमा प्रतिनिधी हजर राहणार नाही. एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर दरम्यान काळ्याफिती लावून निषेध नोंदविण्यात येणार आहेत. आंदोलनात सहभागी लियाफी अध्यक्ष अनिल वसंत वाणी, उपाध्यक्ष राजेंद्र मगन महाजन, नरेंद्र पाटील कार्याध्यक्ष हिम्मत सूर्यवंशी, सचिव कुंदन पवार माजी डिव्हिजनल प्रेसिडेंट सुनील पाटील, डिव्हिजनल खजिनदार डी एन पाटील, माजी शाखा अध्यक्ष सिताराम पाटील, भास्कर पवार, अनिल कासार, उमेश चौधरी, प्रदीप सूर्यवंशी, संजय चौधरी, गौरव चौधरी, संजय पाटील, जितेंद्र पाटील, प्रवीण पाटील, राजेंद्र गंभीर, भरत बोरसे, रामकृष्ण चव्हाण, श्रीमती छाया पाटील इ. विमा प्रतिनिधी बहुसंख्येने सकाळी दहा वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हजर होते.