सचिन खंडारे आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित…
अमळनेर:- येथील प्रताप महाविद्यालयाच्या सेवेत कार्यरत असलेले सचिन खंडारे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना आयडॉल ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
अल्पावधीतच आपल्या समाजकार्याच्या जोरावर मोठा मित्र परिवार जमवला आहे. ‘जिथे कमी तिथे आम्ही’ या उक्तीप्रमाणे सचिन खंडारे यांनी स्वतःला सामाजिक कार्यात गुंतवून घेतले आहे. लहानपणापासून सामाजिक क्षेत्राची आवड असल्याने तरुणांची फळी निर्माण करण्याचे कौशल्य त्यांच्या अंगी आहे. समाजाच्या विधायक कामात से नेहमी अग्रेसर असतात. २००१ साली भूकंपाने हादरलेल्या गुजरात राज्यातील भूज येथे जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीसह तब्बल महिनाभर त्यांनी त्या ठिकाणी ठाण मांडून मदतकार्य व समाजकार्य केले होते. कोरोनाच्या काळात घरात बसून न राहता, त्यांनी सचिनभाऊ खंडारे मित्र परिवाराच्या माध्यमातून गरजूंना मास्क, सॅनिटायझर वाटप उपक्रम राबविला. संकटाच्या काळात वेळोवेळी प्रभागात कोरोना नियंत्रक फवारणी, नागरिकांमधील भीती दूर करणे असेल किंवा प्रभागातील स्वच्छता असेल त्यासाठी स्वतः झाडू हाती घेत त्यांनी कधीच नकार दिला नाही. प्रभागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी त्यांच्या मदतीसाठी सचिन खंडारे अहोरात्र मेहनत घेत राहिले. सचिन खंडारे यांनी कोरोना काळात आपल्या वाढदिवसाचा बडेजाव न करता, अमर संस्था चोपडा संचलित वेले (ता. चोपडा) येथील मानव सेवा तिर्थ येथील गतिमंद विद्यार्थ्यासोबत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी संस्थेतील विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले. गरिबांच्या व वंचितांच्या तोंडात अन्नाचा घास पडावा, हाच त्यामागील त्यांचा उदेश होता. या सामाजिक उपक्रमाचे संस्थेने देखील कौतुक केले. सचिनभाऊ खंडारे मित्र परिवाराचा वृक्षारोपणासह वर्षभर वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवण्यावर विशेष भर असतो. प्रभागासह इतर अनेक ठिकाणी सचिन खंडांच्या सहकार्यातून रोपांची लागवड करण्यात आली आहे.
अमळनेर नगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी सचिन खंडारे यांना सर्व जाती धर्मातील सामान्य नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. जनमताच्या आग्रहास्तव से नगरसेवकपदासाठी निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या प्रभागासाठी विकासाचे व्हिजन त्यांचे तयार आहे. सामाजिक कार्याच्या माध्यमातून ते जनसेवा करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. त्यांच्या या समाजकार्यात त्यांच्या पत्नी सविता सचिन खंडारे यांची त्यांना नेहमीच मोलाची साथ असते. प्रभागातील महिलांना सोबत घेत त्या देखील प्रभागात विविध उपक्रम राबवितात. गरजूंच्या हाकेला साद देणारे व्यक्तिमत्व म्हणून सचिन खंडारे यांचा लौकिक आहे. निस्वार्थीपने से गरजूना मदत करतात. धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. संत गजानन महाराज मंदिराच्या निर्माण कार्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. प्रभागामध्ये राष्ट्रपुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी केल्या जातात. शिवजयंती धुमधडाक्यात साजरी केली जाते. सचिन खंडारे यांच्यासारखा सर्वसामान्य परातील तरुण कुटुंबाच्या मित्र परिवाराच्या व जनसामान्यांच्या आग्रहास्तव समाजकारणाकडून राजकारणाकडे वाटचाल करीत आहे.