सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- येथील भोईवाडा मधील रहिवासी असलेले व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात माजी सहाय्यक प्राध्यापक म्हणून सेवा बजावलेले व सद्या नामांकित कंपनीत नोकरीला असलेले राहुल तुकाराम भोई (वय-35) यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात रसायनशास्त्र विषयात संशोधन करून विशेष प्राविण्य मिळविल्याने त्यांना विद्यापीठाकडून डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी (पी.एच.डी) पदवी प्रदान करण्यात आली.
राहुल भोई यांचे औषधशास्त्र विषयांत पदवी संपादन केली असून सेट परीक्षाही विशेष प्रविण्याने उत्तीर्ण झाले आहेत. प्रताप महाविद्यालय अमळनेर, एम.जे.महाविद्यालय चोपडा व विद्यापिठात शिक्षण पूर्ण करून अगदी खडतर व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळवली. पी.एच.डी. साठी त्यांना विद्यापीठातील प्राध्यापिका रत्नमाला बेंद्रे यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. घराची परिस्थिती हलाखीची असताना व वडिलांनी टेलरिंग काम करून तिन्ही भावंडाना उच्चशिक्षण दिले.आणि त्या शिक्षणाच्या बळावर तिन्ही मुले नोकरी करत आहेत. त्यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याने विद्यापीठातील प्राध्यापक वर्ग, आई वडील, भावंड व गावातील ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव व कौतुक होत आहे.