
नाशिक विभागीय बोर्ड सचिव राजेंद्र अहिरे यांनी केले मार्गदर्शन…
अमळनेर:- शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३च्या फेब्रुवारी/मार्च २०२३ मध्ये होऊ घातलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या आवेदन पत्र भरणेबाबतच्या सूचना, मार्गदर्शन व मंडळाच्या कार्यवाहीबाबतच्या अमळनेर, चोपडा, पारोळा, धरणगांव, एरंडोल तालुकास्तरीय सहविचार सभेचे प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे आयोजन करण्यात आले होते.
सदर सभेस मार्गदर्शन करताना सदोष आवेदनपत्र भरण्याबाबत मुख्याध्यापकांनी सतर्क रहावे असे आवाहन नाशिक विभागीय बोर्ड सचिव राजेंद्र अहिरे यांनी केले तर सहसचिव डॉ. राहुल चौधरी यांनी चुका दुरुस्ती करण्यासाठी बोर्डाशी करायचा पत्र व्यवहार याबाबत मार्गदर्शन केले. तसेच देवधर मॅडम सहाय्यक सहसचिव यांनी ही मार्गदर्शन केले. सदर सभेस ३५० मुख्याध्यापकांची उपस्थिती होती. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. शिरोडे, पी.डी.धनगर विस्तारधिकारी पं.स. अमळनेर, उपप्राचार्य यु.जी.मोरे, प्रा. ए.के. अग्रवाल, प्रा.डि.व्ही. भलकार उपस्थित होते.सदर मान्यवरांचे जुक्टो संघटनेच्या वतीने अनुक्रमे प्रा.सुनिल पाटील (जिल्हा कार्याध्यक्ष), प्रा.दिनेश बी. बोरसे(अध्यक्ष), प्रा.स्वप्नील पवार (सचिव), प्रा.किरण पाटील, प्रा.सी.बी.सुर्यवंशी, प्रा.गुणवंत पाटील यांच्या कडून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी प्रा.आर.एम.पारधी सर यांनी केले तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. उल्हास जी. मोरे यांनी मानले.







