
रविवारी 25 सप्टेंबर रोजी अमळनेर येथे होणार अंत्यसंस्कार…
अमळनेर:- अमळनेरचे सुपुत्र तथा भारतीय नौदलातील जवान शुभम बाळू बिऱ्हाडे (वय 26) हे कर्तव्यावर असतांना दि. 23 रोजी सकाळी कुलाबा येथील मुख्यालयातील कवायत मैदानावर कवायत करत असतांना हृदय विकाराचा झटका आल्याने शुभम बिऱ्हाडे यांचे दुःखद निधन झाले.
ते शहरातील ताडेपुरा भागातील रहिवासी असून गेल्या सहा वर्षापूर्वी शुभम बिऱ्हाडे हे नेव्ही मध्ये दाखल झाले होते. त्यांना गीत गायन, वाद्याची आवड होती. त्यांच्या निधनाची बातमी कळताच शहरात व मित्र परिवारात सर्वत्र शोक व्यक्त होत आहे. शुभम बिऱ्हाडे यांच्यावर रविवार दि. 25 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता अमळनेर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, बहीण व पत्नी असा परिवार असून यावेळी त्यांचा नातेवाईकांचा आक्रोश मनाला हेलावणारा होता.







