
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै.नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय येथे भारताच्या राजकीय एकात्मतेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एस.देसले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची ही पुण्यतिथी साजरी करण्यात आली. हा दिवस ‘ राष्ट्रीय एकता दिवस ‘ म्हणून साजरा करण्यात येतो. याप्रसंगी प्रा. विजय पाटील, सचिन पाटील, अतुल पाटील, दीपक पाटील, श्याम पाटील आणि महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.








