८ नोव्हेंबर रोजी जी.एस. हायस्कूल येथे आयोजन…
अमळनेर– येथील प्रताप महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा.डॉ. एस ओ माळी व प्रतापियन्स परिवारातर्फे स्व.निळकंठ ओंकार माळी यांच्या स्मरणार्थ “तालुकास्तरीय भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा” घेण्यात येणार आहे. दहावी ते पदव्युत्तर वर्ग व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा मंगळवारी (८ नोव्हेंबर) ला सकाळी साडे नऊला येथील जी. एस. हायस्कुल मध्ये होणार आहे. या परीक्षेत प्रथम बक्षीस एक हजार रुपये, द्वितीय बक्षीस ७५० रुपये, तृतीय बक्षीस ५०० रुपये, उत्तेजनार्थ बक्षीस २५० रुपयांची दोन बक्षिसे आहेत. या परीक्षेसाठी कोणतीही प्रवेश शुल्क नसून शनिवारी (ता.५ नोव्हेंबर) पर्यंत प्रा डॉ एस ओ माळी, प्रा जयेश महाजन, गिरीष माळी, दिलीप शिरसाठ यांच्याकडे अथवा ऑनलाईन नावनोंदणी करावी, असे आवाहन प्रतापियन्स परिवारातर्फे करण्यात आले आहे.
अशी असेल परीक्षा…
ही परीक्षा सामान्य ज्ञानावर आधारित असून मराठी माध्यमात राहणार आहे. यात १०० प्रश्न हे १०० गुणासाठी विचारले जाणार आहेत. ही परीक्षा दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असून इतिहास, भूगोल, मराठी, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी इत्यादी विषयांवर प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रश्नपत्रिकेत बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न विचारले जाणार आहेत.